सोबत !!
सोबत....! " साहेब, काय आणू आपल्याला?" सदाच्या या वाक्याने मी निर्धास्त झालो.हे आमचं नेहमीच हॉटेल आणि हा सवयीचा माणूस!खरं तर हा गावाकडचा, पण सवयीने सगळ्या भाषांची ओळख झालेली.मध्ये मध्ये हिंदी इंग्रजी बोलण्याची त्याची सवय.पण बोलण्यामध्ये त्याची स्वतःची एक मिठास असते." वाट पाहायला लागणे, वेळ अंगावर येणे, काहीच न सुचणे त्यासाठी चहा ती सोबत नेहमीच अव्वल...!निदान माझ्यासाठी तरी!...चहाचा एकेक घोट घेताना आपण आपल्यातच मस्त हरवून जातो.अनेक गोष्टी धुंडाळताना मजा येते.अशी आपल्याला अनेक माणसे भेटतात च..काही रक्ता ची काही जीवाची ,काही सख्खी म्हणून नावाजलेली...पण तरीही प्रत्येक वेळी सर्वांची सोबत चालते असं नाही . आपणच आपल्या सोयीनुसार सर्वांची वर्गवारी करतो आणि तशी अपेक्षा धरतो.मग सर्वच कारणांसाठी सदासर्वकाळ एखादी सोबत मिळाली तर चालेल की! अरे आपण असा कधी विचारच केला नाही खरच कोणाची संगत आपल्याला हवी असेल मग ओळीने एकेक नाव समोर यायला लागली.बहिण ,भाऊ नवरा, बायको ,मित्र मैत्रीण सख्खा नातेवाईक , जीवाभ...