किंमत.....!
किंमत....! "उठा काकासाहेब, नाश्ता करायची वेळ झाली". केअरटेकर् च्या आवाजाने काकासाहेबांची शांतता भंग पावली.तशी झोप लागलीच नव्हती त्यांना..पण स्वतःच स्वतःच्या शांततेत गुंग होऊन जाणे हे सवय चांगलीच की! काकासाहेब उठले आणि नेहमीच सस्मित आवाजाने म्हणाले," काय मॅडम, काय म्हणताय"..तशी ती उत्तरली," काही विशेष नाही पण आज तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे ,तुमच्या तब्येतीची बरीच रिकवरी झाल्याने तुम्हाला आज फिरता येईल ..पण जपून ...शरीराला त्रास होईल असं काहीही करायचं नाही ओके.."नर्स च्या शब्दांनी काका साहेबांना जरा प्रसन्न वाटलं.. श्री चिंतामणराव इनामदार हे शहरातील मोठ प्रस्थ.पूर्वापार चालत आलेली प्रगतीशील शेती,त्या जोडीला त्यांनी स्वतः विकसित केलेले व्यवसाय,आयुष्यभर लागलेले समजूतदार पत्नी,पत्नीच्या मागे काळजी घेण्यास उच्चशिक्षित मुलगा आणि कर्तबगार असूनइत्यादी गोष्टी त्यांची कीर्ती चिरंतन ठे...