... असेही एकदा घडावे ...!
..... असेही एकदा घडावे !! काहीच नवं होत नाहीये म्हणून आवडीची एखादी लकेर गुणगुणावी.. ..... आणि सूर लागता लागता अखंड गाणेच मनातून उमलून यावे.. तेव्हा आनंदाचा एक किरण लख्ख हदयात उमटावा..... ............ असेही एकदा घडावे!! निराशेचा कहर पसरत असताना, संपून जाणाऱ्या जीवांकडे तटस्थपणाने पहात , आपलेही जगणं काळाच्या खुंटीला टांगून ठेवावंसं वाटत असताना, कुठून तरी नेणिवेचा पवित्र हुंकार यावा आणि जगण्याचा शुभ्र चांदणप्रकाश पुन्हा पसरावा... ........... असेही एकदा घडावे !! आयुष्याच्या देण्यांची पूर्तता करून झाल्यावर .जीवाचे पोकळ अस्तित्व जाणल्यावर , पैलतीराचे वेध लागलेल्या थकलेल्या मूर्तीकडे कासावीस होऊन पाहताना.... ..... अचानक एखादया लहानग्याचा खळाळता हसणारा धबधबा कोसळत यावा आणि प्राक्तनाची क्षणभंगुरता वाहून जावी.. ...