पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी तीच आहे....!!!

 संस्कारांच्या अग्नि परीक्षेत तावून निघालेली तरीही तळपत राहिलेली एक प्रखर शलाका,  स्त्री-पुरुष द्वंद्वाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह कोरत ठेवलेली एक अखंड निर्णय पताका,  मी तीच आहे....  मी मैथिली, उर्मिला, मंदोदरी आणि  तारा.....!  मदा़ंध वर्षावाने  अपमानित नि पेटून उठलेली,  त्याच संघर्षातून घायाळ झालेली विनाशा,  अस्मितेवरचा घाला परतावून लावत संहाराच्या शेवटीची अजिंक्य धारदार खड्गा,  मी तीच आहे.....  मी कुंती, गांधारी, द्रौपदी आणि अंबा....!!  परंपरेचं जोखड उखडून देत  ज्ञान किरणाने झळाळलेली पवित्र बुद्धिमत्ता,  प्रसंगोपात झालेले हल्ले पचवून पुन्हा सामर्थ्याने उभारी पेलणारी अतूट विशाखा,  मी तीच आहे. ..  मी जिजा, अहिल्या ,सावित्री आणि रमा...!!!  सृष्टीच्या अटळ प्रलयंकारी विनाशातही नीतीची  वृत्ती जोपासणारी सात्विक प्राज्ञा,  भयंकर संहारात ही  भविष्य जपून ठेवणारी,  अस्तित्व तारणारा तपस्वी निर्मम भावना,  मी तीच आहे....  मी जननी, उध्दारिणी, नियंती आणि सृजना...!!!!    ...