पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माध्यान्ह....!

                       माध्यान्ह.....!!!        तसं पाहायला गेलं तर माध्यान्ह ही कुणाच्या आवडीची गोष्ट असेल असे वाटत  नाही. माध्यान्ह या शब्दाचा अगदी सरळ अर्थ म्हटलं तर टळटळीत दुपार ..पण माध्यान्हीचा  चा दोन तासाचा वेळ मला जरा जास्तच भावतो...             सकाळची ताजी तवानी लगबग संपून जरा निवांत व्हायला सवड मिळते ..अजून दुपारच्या जेवणाला अवकाश असतो किंवा झालेली तरी असतात ..त्यामुळे अगदी निवांत आळसावलेली वेळ नाही की कामाचा डोंगर उभा आहे म्हणून वेळ काढायची घाई नाही..जरा निवांत राहून आपल्या मध्येच रमायला, एखाद दुसरं पुस्तक हाताशी धरून ओघवतं नजरे खाली घालायला अशी सुंदर वेळ मिळणार नाही ...सकाळच्या कामात काय राहिलं याचा ताळेबंद आणि नंतरच्या कामाचाही मेळ घालायची संधी ...एखादी आवडीची लकेर गुणगुणावी किंवा शांत गझल ऐकत आठवणी आळवाव्यात...दोन्ही आनंद देणारं..!तसं माध्यान्ह काही अगदी कडक उन्हाचा प्रहर नव्हेच..कडक प्रहराची सुरूवात म्हणूया हवं तर...हिवाळ्यातील  माध्यान्ह तर ब...

किनारे..!!!!

समुद्राच्या लाटांची गाज ऐकत समीर नमिता ची वाट बघत होता. दोन वर्षांनंतर तो तिला भेटणार होता .लांबूनच त्याला नमिता सारखी आकृती दिसली .जवळ येताच त्याने ओळखलं..नमिताच ती..केसांचा लांबसडक शेपटा तिला तेव्हा ही नकोसा वाटायचा ..पण केवळ आपल्यासाठी ती ती वागवत होती. नमिता जवळ येताच म्हणाली, "समीर मला उशीर झाला नाही .""फार नाही ,पण वाट पहावी लागली "!आणि तो तिच्याकडे बघतच राहिला..अंगकाठी फारशी बदलली नसली तरी केसांचा बॉबकट, कपाळावर असणारी नकळत लहानशी टिकली आणि सगळ्यात आकर्षून घेणारा डोळ्यांचा आत्मविश्वास आणि तिचे ते शांत, प्रफुल्ल प्रसन्न हास्य ...जे समीरला कधीच बदलू नये असं वाटत होतं..!!         "बोल ..कशासाठी एवढ्या तातडीने बोलवलं ?"तंद्री भंग करत नमिता म्हणाली. तसा तो चपापला आणि म्हणाला, "मला वाटते ,आपण आपल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करूया ..आरवची सेटलमेंट झाली असली तरी तो पुन्हा लंडनहून भारतात येईल असं वाटत नाही..आणि पुढची काही वर्षं अशी काढायची म्हणजे...  तुलाही ते जड जाईल ...!"तशी नमिता उत्तरली, "समीर ,मी कधी असं म्हटले ?मी आज या घडीला...