मुक्तचिंतन

             नमस्कार मित्रांनो...
                                     आपण रोजच आपल्या व्यापात असतो.कळत नकळत काही प्रसंग आपल्याला स्पर्शून जातात.कधी काही आठवणी दिवस सुंदर करतात किंवा काही स्मृतींची हुरहूर ही जीव बेचैन करते. मनाचा तजेला उत्फुल्ल असताना चार आवडत्या ओळी आपण गुणगुणतोही,तर कधी  स्वप्नांची दुनिया जगण्यासाठी अधीर्  होतो.अशा अनेक प्रसंगाची असलेली ओळख,त्यास असलेला स्पर्श, वेदना ,
आनंद, तेज,स्फूर्ती असे अनेक पदर आपल्याला मोहून टाकतात.अशाच अनेक व्यक्त ,अव्यक्त भावनांचा परीस
 स्पर्श आपल्याला भेटतोय...ललित,कथा,कविता,संवाद याद्वारे 'अनुभूती 'या ब्लॉगमधून....तेव्हा ब्लॉग दर शनिवारी आपल्या भेटीस येईल...लवकरच भेटू आपल्या सदिच्छांसह...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा