सोबत !!

 सोबत....!

" साहेब, काय आणू आपल्याला?" सदाच्या या वाक्याने मी निर्धास्त झालो.हे आमचं नेहमीच हॉटेल आणि हा सवयीचा माणूस!खरं तर हा गावाकडचा, पण सवयीने सगळ्या भाषांची ओळख झालेली.मध्ये मध्ये हिंदी इंग्रजी बोलण्याची त्याची सवय.पण बोलण्यामध्ये त्याची स्वतःची एक मिठास असते."                       वाट पाहायला लागणे, वेळ अंगावर येणे, काहीच न सुचणे त्यासाठी चहा ती सोबत नेहमीच अव्वल...!निदान माझ्यासाठी तरी!...चहाचा  एकेक घोट घेताना आपण आपल्यातच मस्त हरवून जातो.अनेक गोष्टी धुंडाळताना मजा येते.अशी आपल्याला अनेक माणसे भेटतात च..काही रक्ता   ची काही जीवाची ,काही सख्खी म्हणून नावाजलेली...पण तरीही प्रत्येक वेळी सर्वांची सोबत चालते असं नाही . आपणच आपल्या सोयीनुसार सर्वांची वर्गवारी करतो आणि तशी अपेक्षा धरतो.मग सर्वच कारणांसाठी सदासर्वकाळ एखादी सोबत मिळाली तर चालेल की! अरे आपण असा कधी विचारच केला नाही खरच कोणाची संगत आपल्याला हवी असेल मग ओळीने एकेक नाव समोर यायला लागली.बहिण ,भाऊ नवरा, बायको ,मित्र मैत्रीण सख्खा नातेवाईक , जीवाभावाचा मित्र  .... आणि असेच.. पण तरीही काहीतरी राहतयं... नात्याच्या अलीकडे.. मैत्रीच्या पलीकडे... काही तरी हरवतयं का... काही सापडू पाहत यं का...किती क्षण आजमावतो आपण! पण या सार्‍या पासून आपण अगदी व्यवहारिक असतो.आपण गुंतत नाही फार काळ कशातच.. नवरा कितीही जीवाभावाचा असला तरी आतल्या सगळ्याच गाठी आपण त्याच्या समोर उलगडत नाही. बायको कितीही संसारी असली तरी तिच्याकडे तिच्या समरसते पलीकडे काहीतरी असावं असं शोधतोच आपण.. मिमांसोबत कितीही वेळ गेला तरी त्याच्या सोबत सगळी कोडी सोडवत नाही.
        मग आपण शोधत बसतो आरसपानी सोबत! नि०र्या ज साथ.. जेथे व्यवहार तर नाहीच पण छुपेपणाही नाही.. माझा मला पूर्ण सादर होतो तेथे.!टोचणारे प्रसंग असले तरी मूकपणातून आलेलं सांत्वन दिलासा देतं. निरंतर भेट झाली नाही तरी नुसत्या अस्तित्वानेही मन सावरलं जातं.. मग लक्षात आलं माणूस कितीही गर्दीत असला तरी त्याचं जग दोनच विभागात असतं. एक मी माझा... संपूर्ण माझा!! आणि एक बाहेरचा! त्यात मग अगदी सगळे.. अरे हो खरचं... असं अधूनमधून माझा मलाच भेटायला काय हरकत आहे? आपण भेटलोच नाहीत कित्येक वर्षात आपल्याला .. स्वतःला अगदी गृहीतच धरुन अक्षम्य दुर्लक्ष केलं.. पोटापाण्याचा व्यवसाय करताना तो नेहमीच दुर्लक्षित राहिला.गेल्या कित्येक वर्षात आपण आपल्या मनाला सादच दिलेली नाही.खरे तर त्याच्या इतकी स्वच्छ प्रामाणिक सोबतच नाही.नव्हे असूच शकत नाही.
असलेल्या उणेपणासहीत स्वतःला पुरते सामावून घेणारा माझा मीच ! 
        एकदा ती सोबत मिळाली की इतर कुणाची सोबत मिळायची गरजच नाही.मग सदैव एक आश्वासक विश्वास असतो की मी एकटा नाही.दुसऱ्याचा वागणेही मग आपल्याला खूप त नाही. आपलं जग सुंदर करायचा एक प्रयत्न आपल्याकडूनही होतो. शहाणपणाचं बोलणं नको की तिरस्काराचा कटाक्ष नको.. आणि माझा मीच हसलो ! किती हलकं आणि प्रसन्न वाटतयं मला माझ्याच भेटीनं...! चेहऱ्यावरचे हास्य बघून सदा परत आला."साहेब कोणी आले नाही?"त्याच्याकडे पहात मी भानावर आलो आणि स्मितहास्य करून म्हणालो,"एक और चाय!"."लेकिन साब आप तो अकेले ह हो"... मंद हसत मी उत्तरलो," मैं ही मुझसे बरसो से गुम हो गया था ! आज मिल गया तो सोचा एक  चाय साथ बैठकर हो जाए!"
सदा पुन्हा स्तिमित आणि मी माझ्या च मस्तीत.. एका निर्मळ सोबतीत...!


                                                       -- गौरी जंगम
                                            
            
 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा