कृतज्ञ..!



              मित्रांनो,  जगण्याचा मार्ग हा एकच असतो पण प्रत्येका चा वेगवेगळा.! वाटेवरून पुढे चालत असताना येणाऱ्या क्षणांसाठी चैतन्य उसळत असते पण हुरहूर लागली की आपण मागे वळून पाहतो. मग सुरू होतो आठवणींचा आणि अनुभवांचा प्रवास. तो प्रवास उलटा हि करता येतो पण केवळ कल्पनेने किंवा मनाने! प्रत्यक्ष अनुभूती त्यात नाही म्हणून जगण्याच्या प्रत्येक क्षणाला जाणिवेचा स्पर्श असणे महत्त्वाचे. . पण ती प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते केवळ दैवी देणेच! असा दैवी स्पर्श लाभलेल्या व्यक्ती या नेहमीच नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्या असतात. सतत आपल्या काल गतीने चालणारा निसर्ग त्यांना नेहमी प्रेरणा देतो. सहज घडणाऱ्या प्रसंगातून ही त्यांना भावनेचा ओलावा टिपता येतो .त्यांचे असे जगणे सर्वांना हवेहवेसे वाटते .त्यांचा सहवास हा सर्वांना प्रफुल्लित करणारा असतो .त्यांच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या जीवनात एक विलक्षण विरंगुळा निर्माण होतो. अशी माणसं वाचण्याचा ..!अशी माणसं वाचताना त्यांच्या अनुभवाचा प्रत्यय घेणे हा ही एक सुखद अनुभव असतो.अशा माणसांच्या अनुभवाने सहाय्याने आपण आपला प्रवास सुखद करण्याचा प्रयत्न करतो आणि नकळत अशा माणसांसाठी निसर्गाप्रती कृतज्ञतेचे धनी होतो...!!! 




                                               गौरी जंगम..! 

टिप्पण्या