शल्य..!
शल्य...!
मेघनाने धावत-पळत एसटी स्टँड गाठले ...सव्वानऊ वंजारवाडी ची एसटी नेमकी आज वेळेवर येऊन थांबली होती..जागेवर जाऊन बसे पर्यंत एसटी वाहकाने एसटी निघणार असल्याची रिंग वाजवली ,,मेघना ने हुश्श केले..नशीब एसटी वेळेवर निघाली..नाहीतर आजचे काम उद्यावर जाणार होते..वंजारवाडी ला जाणारी ही एकच एसटी...हीच दोन तासात गावी पोहोचणार..तासभर गावी थांबून पुन्हा त्याच पावली परत येणार ...फक्त सोमवारी आणि शुक्रवारी ही सोय होती..इतर दिवशी मात्र मग खाजगी किंवा स्वतःच्या ओळखीच्या वाहनांवर भिस्त..!
आज मेघना आवर्जून वंजारवाडीला जाण्याचे कारण म्हणजे सरिता वहिनींचा आलेला फोन..!सरिता वहिनी तशा अलीकडच्याच परिचयाच्या ...कष्टाळू, समंजस आणि आपण बरं आपलं काम भलं..अशा प्रवृत्तीच्या.! .त्यांच्या मानाने अगदीच सुमार बुद्धिमत्तेचा आणि कष्टाची सवय नसलेला नवरा त्यांच्या पदरात होता ..एकच मुलगा शाळेत जाणारा..त्याच्या आशेवर सरिता बाईंनी कसोशीने संसार केला. पण घरचे दारिद्र्य संपत नव्हतं..बाहेर नोकरी करायची तर शिक्षण हे अपूर्ण होतं ,पण व्यवहार मात्र अतिशय चोख ..!मात्र आजच्या कागदी घोडे नाचवणया च्या युगात त्याला कितीशी किंमत..?त्यांनी कामाला बाहेर जाण्याबाबत विचारले नवऱ्याने तर रागाचा च पवित्रा घेतल ,"जेवढं आणून देतो तेवढ्यात भागव..आपल्या घरात कोणीही बायका बाहेर जात नाही ,,तू हि जायचं नाही.."असे त्यांनी ठासून सांगितले..."अहो पण तुम्ही आणलेल्या कुणाचं समाधान होतं.?आज जेवणाला हेच केलंय ,चवच नाही , रोज आमटी आणि दामटी अशी सतरा नावे ठेवता..तुम्हाला नाही जमत तर मी तरी बाहेर जाईन ..माझ्या मापाचं काहीतरी काम मिळेलच.!" "मला जमत नाही म्हणजे..?तुला काही उपाय ठेवतोय का? कपड्याचे दुकान सांभाळणाऱ्या माणसाला असं किती मिळणार आहे? तुला पुरत नाही म्हणून सांग की ..चांगलीच चवीची आहेस की तू ..? "
या वाक्याने सरिता ताई खूप हेलावल्या..माहेरी फार नाही पण लोकांची कामे करून समाधान चालू होतं..कधी रानातली काम करून ,कधी चार घरची स्वयंपाकाची कामे करून खात होते .सारेच राबायचे आणि सारेच खायचे पण खास समाधानाने मिळायची ..पण इथे तर बडा घर आणि पोकळ वासा..!दोन पिढ्यांच्या आधीचा बडेजाव..!एकदा भात तर एकदा भाकरी असे यांचे जेवण.!शिक्षणाची तर सोयच नाही .त्यांना अशा त्रासाचे काही वावगे नव्हते .पण कष्ट करणाऱ्या माणसाला मागे खेचणारी ही प्रवृत्ती त्यांना आवडत नव्हती.शेवटी त्यानी नवर्यांला सासू-सासर्यांच्या समोर सगितलं, 'सुर्व्यांच्या रानात कामाला जाणार आहे .'.एवढा मोठा गहजब केला की विचारता सोय नाही..सासू-सासर्यांनी तर बोलणं टाकलं ..तुझ्या वागण्याने घराण्याला कमीपणा येईल ,असं काहीसं बोलत होता दिवसभर .!पण शेवटी सरिता ताई यांनी हार मानली नाही. रानात सकाळपासून दुपारपर्यंत काम होतं ..पण पोटापुरते पैसे मिळत होते . दुपारनंतर घरी असल्याने घरी हे फारशी आबाळ होत नव्हती .मुलाचे शिक्षण व्यवस्थित सुरू झाले .तो समाधानाने शिकू लागला. पण घरात मोठ्यांच्या धुसफूस होती. त्यांच्यात कधीतरी बदल होईल अशी आशा बाळगून सरिताताई तोंड देत राहिल्या .काम करून गाठीला चार पैसे ठेवू लागल्या.
बचत गट आणि महिला विकास प्रबोधन संस्थेच्या निमित्ताने मेघना आणि सरिताताईंची ओळख झाली . शांत समंजस दिसणार्या सरिता ताईंची मेघना ची चांगली गट्टी जमली. वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा आवडीने ऐकत .शंका विचारत. तसे बदल त्यांनी आपल्या विचारात आणि वागण्यात केले होते .पण बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मनात व्यवसायाविषयी विचार सुरू होते .त्याची एकदा चर्चाही झाली होती .मेघनाने सर्व प्रकारे मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी शब्द दिला होता. काल त्यांचा फोन आला, लगेच भेटायला या म्हणून...नेमका काही अंदाज आला नाही म्हणून सरिता पटकन हो म्हणाली आणि आज निघाली. विचारांची साखळी चालूच होती ..इतक्यात वंजार वाडी जवळ एसटी थांबली . तोच शेवटचा स्टॉप असल्याने एसटीतून सारे उतरले. सरिताताई यांच्या घराकडे निघाली होती. इतक्यात त्यांचा मुलगा समोर आला .आईने निरोप दिलाय की "सुर्व्यांच्या रानाकडे या, आई तिथेच आहे. "
मेघना आणि सरिता यांचा मुलगा दोघेही सुर्व्यांच्या रानाकडे गेले .सकाळची कामाची वेळ आटोपून सगळे आंब्याच्या झाडाखाली जेवणाला बसले होते. मेघना गेले तशी साऱ्यांनी उरकलं ..साऱ्याजणी तिच्या भोवती जमा झाल्या .सरिता ताई म्हणाल्या, "मेघना ताई ,माझ्या मनात एक विचार चालू आहे .सूर्वे राना चा एक तुकडा ते वाट्याने देणार आहेत .तो मी घेऊन सेंद्रिय शेतीचा प्रयोग करणार आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. माझ्या काही मैत्रिणी मला मदत करतील .सुरुवातीला थोडा फार मोबदल्यात काम करतील आणि नंतर जम बसल्यानंतर व्यवस्थित चालू होईल असे मला असे मला वाटते ".मेघना अवाक झाली. "ठीक आहे, पण बाहेरची आणि शेतातील सारि कामे तुम्हालाच करावे लागतील. तुमचा कस लागेल .एकदा अंदाज आला की तुम्हालाही हुरूप येईल "..सुरुवातीला काय काय करावे लागेल याची त्यांनी यादी केली.तोंडी बोलणे ,लेखी व्यवहार ,माहिती मिळवणे, सेंद्रिय खते ,शेतीचे व्यवहार या सार्यांची माहिती मेघना आणि सरिता ताई यांनी घेतली. एक दिवस ठरवून त्यांनी शेती पूर्वीची कामे करून घेतली. भाजीपाला कोणता घ्यायचा आहे नक्की केले .त्यासाठी बाजारपेठ विक्री यांचे निरीक्षण केले आणि योग्य दिशा ठरवली .या सर्व धांदलीत घरच्यांचा पाठिंबा शुन्य होता .नवरा आधीच नाराज नाराज होता. त्यातल्या उद्योगाने आम्हाला तोंडावर पाडू नको असे सारखे म्हणत होता. पण सरिता ताईनी दुर्लक्ष केलं .नाही म्हणायला मुलाला थोडाफार कळत होतं. तो आईला मदत करायचा प्रोत्साहन द्यायचा. आपण काहीतरी चांगलं करूया म्हणायचा. हळूहळू कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला शंका घेणारे लोक नंतर कौतुकाने मदतीचे चार शब्द सांगू लागले. त्यांच्या अनुभवाचा सरिता ताईंना उपयोग होऊ लागला. सेंद्रिय भाजीपाल्याला खूप मागणी होती .त्याचा फायदा सरिता ताईंनी घेण्याचे ठरवले .मेघना च्या मदतीने वेगवेगळ्या सोसायटी, वसाहती ,दुकानदार ,मॉल या ठिकाणी संपर्क करून त्यांनी साखळी निर्माण केली .त्यातुन व्यवहार विक्री खरेदी होऊ लागली .त्यांच्या विश्वासाला विश्वासाला तडा गेला नाही. सारे व्यवहार चोख असल्यामुळे विश्वासू माणसांची संख्या वाढली जम बसवण्यास सुरुवात झाली असे त्यांना वाटू लागले .मिळालेला पैसा योग्य नियोजन करून त्या साठवायच्या .मुलगा हे सारे कष्ट पहात होता. तो ही मनापासून मदत करायचा .हळूहळू त्यांना यश येऊ लागलं .कामाचा व्याप वाढला. सरिता ताईनी स्वतःची जमीन घेऊन शेती व्यवसायाचा पाया घातला मात्र सुरुवातीपासून साथ दिलेल्या लोकांची त्यांनी विश्वासार्हता जपून ठेवली.
आता मुलगा मोठा झाला होता. कॉलेजचे शिक्षण करत करत त्यांनी आईच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरवले ..आईचा अनुभव ,प्रामाणिक लोकांची साथ आणि स्वतःचे कष्ट यातून त्याने स्वत: व्यवसायाचा डोलारा सांभाळला .त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जरा सुधारु लागली. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला यायला लागले. मात्र या मायलेकाचा उत्कर्ष पाहून सासरी कधीही कौतुक झाले नाही. उलट टोमणे मारणार्या मध्ये सामील असायचा. त्याचा नैसर्गिक स्वभाव म्हणून सरिताने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्णपणे स्वतःला आपल्या व्यापार बुडवून घेतले .काळाच्या ओघात नवराही मरण पावला. पण शेवटपर्यंत सरिताला परकाच राहिला . मेघना व मुलाने आईला सावरले. शेवटी सरिता ताईच म्हणाल्या,
"मेघना ताई ,तुम्ही तरी काय करणार सामान्य कुवतीचा नवरा भेटला तर बाईने तसेच आयुष्य काढावे, या समजुतीचा समाज आहे .मग ती बाई आयुष्यभर कुढत राहिली तरी चालेल पण स्वतःच्या क्षमतेचा विकास करून तिने प्रगती केलेली लोकांना बघवत नाही .कारण नवऱ्याच्या पुरुषी वर्चस्वाला धक्का लागेल आणि याला मोडता घालणाऱ्या स्त्रियांच्या वाटेला बऱ्याचदा काटे येतात. नेहमीच चार पावले पुढे गेलेल्या स्त्रीयांना हे काटे पचवावे लागतात. यात मी तरी वेगळं काय केलं? "
सरिता ताईंच्या शब्दाने मेघना नि:शब्द झाली .एवढं कर्तुत्व दाखवून हे स्वतःकडे कमीपणा घेण्याचा मोठेपणा की समाजाच्या चुकीच्या विचारांकडे बोट दाखवून तो स्वीकारण्याचा मनाविरुद्ध चा झालेला पराभव ...? आपण सुशिक्षित स्त्रिया फेमिनिझम चा उदो उदो करतो आर्थिक सामाजिक कौटुंबिक समानतेची मागणी करतो आग्रह धरतो ,पण फेमिनिझम नेमकं कोणासाठी ...??काही हजारात पगार घेऊन, आधुनिक जीवनशैली जगणाऱ्या तरीही कुटुंबाच्या,नवऱ्याच्या तथाकथित दबाव सहन करणाऱ्या स्त्रियांसाठी की पारंपरिक मानसिकता बदलणारच नाही म्हणून त्याला वळसा घालून स्वतःचा आर्थिक, सामाजिक उत्कर्ष साधारण साधणार्या सरिता वहिनी आणि त्यांच्यासारख्या अनेक अल्पशिक्षित स्त्रियांसाठी. .?ही सांगड घालायची कशी अशा विचारातच मेघना एसटीत बसली.
------गौरी जंगम..!
Nice
उत्तर द्याहटवा