मैत्र...!!!!

   

अजूनही शोधत आहे असे एक मैत्र

तेथे नेहमीच फुलावा आनंदाचा चैत्र... 

         तुझ्या माझ्यातले सारेच मिटावे अंतर

          दुनियेलाही न कळणाऱ्या प्रश्नांचे तेथे असावे उत्तर..... 

काम, दाम ,आवडी निवडी ,छंद आणि मते

नाही जुळली तरी एकमेव सोबती चे पक्के नाते... 

             बोलण्या पेक्षाही अंतरातील  जुळवून तेथे तार

               नजरेच्या नि मुक्त टाळी तले  उमगे तेथे सार.... 

दुसरा ,तिसरा ,परका ,आपला ,नसला तरी चालेल

माझ्यातलाच मी आणि त्याचेही मैत्र उसळेल..... 

                 सापडेलच कधीतरी ती संगत, फुलेल तीही रंगत

               अजून आहेच आयुष्य तर, मिळेल शोधासाठी उसंत.... 

यावे जमून असे नाते आणि उत्कट भाव

तृप्त  मैत्र आणि जगण्याचाही निस्सीम डाव. ...!!!! 



    



टिप्पण्या