.....आताशा थोडे जगायला जमत होते.!!
.... आताशा थोडे जगायला जमत होते..!! मुखवट्यामागचे चेहरे ओळखत पारखून घेत, शब्दांचे अर्थ समजता समजता उलगडत, आताशा थोडे जगायला जमत होते...! नशिबाला जरासा वळसा घालत, कर्माला थोडी जास्त गती देत, हातातून सुटलेल्या स्वप्नांनाही जवळ करत करत ...... आताशा थोडे जगायला जमत होते...! कधीतरी स्वतःला चकवा देत नाईलाजाने, आणि परक्याला कौल देत नकळतपणे, दुरावत राहिलो सतत माझ्यातून मला, कधी तरी आपला आवाज ऐकत उदासपणे ...... आताशा थोडे जगायला जमत होते. .! पण तरीही चकवत राहिल्या जगण्यातल्या वाटा, वळणेच तिरकी आयुष्यातली मग चालावे सरळ कसे, तरीही काळोखातून कानोसा घ्यायचे ठरवले होते ..... आताशा थोडे जगायला जमत होते. ...! मग वाटले कधी आपलाही तळ शोधत जाऊ, हरवलेल्या मनाचा आपणच सुर होऊन पाहू... करताना असे कधीतरी सापडेलच की मुक्काम...