माध्यान्ह....!
माध्यान्ह.....!!! तसं पाहायला गेलं तर माध्यान्ह ही कुणाच्या आवडीची गोष्ट असेल असे वाटत नाही. माध्यान्ह या शब्दाचा अगदी सरळ अर्थ म्हटलं तर टळटळीत दुपार ..पण माध्यान्हीचा चा दोन तासाचा वेळ मला जरा जास्तच भावतो... सकाळची ताजी तवानी लगबग संपून जरा निवांत व्हायला सवड मिळते ..अजून दुपारच्या जेवणाला अवकाश असतो किंवा झालेली तरी असतात ..त्यामुळे अगदी निवांत आळसावलेली वेळ नाही की कामाचा डोंगर उभा आहे म्हणून वेळ काढायची घाई नाही..जरा निवांत राहून आपल्या मध्येच रमायला, एखाद दुसरं पुस्तक हाताशी धरून ओघवतं नजरे खाली घालायला अशी सुंदर वेळ मिळणार नाही ...सकाळच्या कामात काय राहिलं याचा ताळेबंद आणि नंतरच्या कामाचाही मेळ घालायची संधी ...एखादी आवडीची लकेर गुणगुणावी किंवा शांत गझल ऐकत आठवणी आळवाव्यात...दोन्ही आनंद देणारं..!तसं माध्यान्ह काही अगदी कडक उन्हाचा प्रहर नव्हेच..कडक प्रहराची सुरूवात म्हणूया हवं तर...हिवाळ्यातील माध्यान्ह तर ब...